prabodhini news logo
Home आर्थिक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडून सिंदेवाही येथील कर्करोग ग्रस्त महिलेस आर्थिक...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडून सिंदेवाही येथील कर्करोग ग्रस्त महिलेस आर्थिक मदत

0
297

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

सिंदेवाही येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये वास्तव्यास असलेल्या शांताबाई येग्गेवार (60) यांना कर्करोग झाल्याची माहिती मिळताच काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका वैशाली पूपरेड्डीवार तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय पुपरेड्डीवार कर्करोग ग्रस्त महिलेस भेट देत त्यांना आ.विजय वडेट्टीवार तर्फे आर्थिक मदत देऊ केली.

राजाचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभा क्षेत्र तसेच परिसरातील विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन मदतीचा हात सतत पुढे केला आहे. अशातच सिंदेवाही येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये वास्तव्यास असलेल्या शांताबाई येग्गेवार (60) यांना कर्करोग झाल्याची माहिती मिळाली. ही माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांना सांगितले असता त्यांनी तातडीने सूचना करत सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पुपरेड्डीवार व प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांना पाठवून कर्करोग ग्रस्त महिलेस आर्थिक मदत पोहोचती केली. राज्याचे विरोधी पक्षनेते तसा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून संकट ओढावलेल्या व्यक्तींच्या हाकेला प्रतिसाद देऊन मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन संजय पुपरेड्डीवार यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here