पुपरेड्डीवार दांपत्त्यांचा पुढाकार – तांबेगडी (मेंढा) येथे सुविधा
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाहीचे संचालक तथा त्यांच्या पत्नी नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तालुक्यातील तांबेगडी (मेंढा) येथे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वखर्चातून मोक्याच्या ठिकाणी बेंचेस उपलब्ध करून दिले.
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विविध सेवाभावी कार्य याची ख्याती सर्व दूर पसरली आहे. अशातच त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा पुढे नेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक सिंदेवाही तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पूपरेड्डीवार व त्यांच्या पत्नी नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार या दाम्पत्यांनी तांबेवाडी (मेंढा) येथे भेट दिली असता मोक्याच्या ठिकाणी नागरिकांच्या बैठकीची गैरसोय होत असल्याबाबत समस्या जाणून घेत त्यांचे करिता स्वखर्चातून सिमेंट काँक्रीट बेंचेस उपलब्ध करून दिले.
यामुळे तांबेवाडी मेंढा येथील मुख्य परिसरात बसविण्यात आलेल्या सिमेंट काँक्रेट बेंचेस मुळे नागरिकांची गैरसोय टळली असून गावकऱ्यांनी त्यांची आभार मानले आहे.

