
गोंदिया – दि.29 : राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे 30 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6.45 वाजता नागपूर येथून गोंदियाकडे मोटारीने प्रयाण. रात्री 9.45 वाजता गोंदिया येथील शासकीय निवासस्थान येथे आगमन व राखीव. 1 मे 2025 रोजी सकाळी 7.45 वाजता शासकीय निवासस्थान गोंदिया येथून पोलीस मुख्यालय मैदान कारंजा कडे प्रयाण. सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमीत्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथे इनक्युबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर गोंदिया येथे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर शासकीय निवासस्थान गोंदिया येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता गोंदिया येथून नागपूर विमानतळाकडे मोटारीने प्रयाण करतील.
पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम
गोंदिया – दि.29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिन समारंभानिमीत्त गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथे राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.














