आजचा लेख – बालपणाची मैत्री
बालपणाची मैत्री ही खूप निरागस मायाळू पक्की मैत्री होती
बालपणीच्या आम्ही सात मैत्रिणी आम्हाला फुलांचा छंद होता पूर्ण मैत्रिणी फुले आणायला खूप लांबपर्यंत जायचं विकतच आणायचं पण अशी एक हऊस होती सकाळी उठले दहा पैसे घेतले की फुले आणायचं आवळे चिंचा बोर ही एका दुपट्ट्यात घ्यायचं ना घरी येऊ पर्यंत खात खात येत होतो तेव्हा आम्हाला कुणाचीच रोखठोक नसायची आमच्या मनाचे आम्हीच मालिक पण आमच्या मैत्री खूपच पक्की होती फक्त शाळेत वेगळे जायचं देवळाची तर विचारूच नका सर्व देवी देवतांना आम्ही रोज हजेरी लावायला जात होतो कधी चुकवत नव्हतो आणखी रामायण महाभारत तर आमच्या आवडीचे टीव्ही सिरीयल आमची जागा नेमलेली राहायची बिलकुल टेलिव्हिजनच्या शंभर आधी चलन चित्र त्यासाठी याच्या आम्ही पूर्ण मैत्रिणी अख्खी रात्र बसून पाहायचो पण कालांतराने शिक्षण झाले तर दुसऱ्या राज्यात मी महाराष्ट्रात आली अशी आम्हा मैत्रीनी सर्वांचे लग्न झाले सर्व वेगवेगळ्या भागात केली पण हरवलेली मैत्री आजही आठवतं आठवणी झाला की मन भाळावून जाते. मैत्रीच्या पलीकडचे नातेच मैत्रीचे मैत्रीला कोणत्याच प्रकारचे उपमा देवू शकत नाही .सुखाच्या काळात कोणतीही मैत्रीची आठवण नसली तरी दुःखाच्या काळात खांद्यावर हात ठेवणारी निशब्द पाठीमागे उभी राहून साथ देणारी व्यक्ती म्हणजेच मैत्रीन होय..
लेखिका – रंजना भैसारे
नागपूर

