
जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – म.वि.प्र.समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर वरखेडा विद्यालयात,9 ऑगस्ट क्रांतिदिन,नागपंचमी जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीसूर्य बिरसा मुंडा,सह्याद्रीचा ठाण्या वाघ राघोजी भांगरे,शहीद भगतसिंह, राजगुरु,सुखदेव यांच्या प्रतिमेचे संयुक्तपणे पूजन शालेय समिती सदस्य नंदू भाऊ काळोगे,विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक पर्यवेक्षक श्री.सुनील पाटील सर,जगदीश वडजे(युनिव्हर्सल ह्यूमन right तालुका उपाध्यक्ष) ,कांता देव(बजरंग दल दिंडोरी तालुका प्रमुख ),निखिल मातेरे(बजरंग दल दिंडोरी तालुका संयोजक ),कैलास उगले भाऊसाहेब,कैलास धात्रक भाऊसाहेब,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले
क्रांति दिन,नागपंचमी,आदिवासी संस्कृतीचे महत्व आणि कार्याची माहिती विद्यालयातील गौरी चहाळे,वृषाली मोरे,संपत्ती जाधव, गायत्री जमधडे,अनुष्का बलसाने आदी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितली.
विद्यालयातील उपशिक्षिका सविता भोये यांनी जागतिक आदिवासी दिन आणि आदर्श अदिवासी संस्कृतीचे महत्व यांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
उपशिक्षिका प्रतिभा देशमुख यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्यlचा इतिहास व नागपंचमीचे महत्व विषद केले.
उपशिक्षिका वृषाली रौंदळ मॅडम यांनी ‘ये मेरे वतन के लोगो..हे देशभक्तिपर गीत सूंदर रित्या सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक पर्यवेक्षक सुनील पाटील सर यांनी भारतीय स्वातंत्र, क्रांतिकारक,प्रबोधनकार यांचे महत्व,नागपंचमी सणाचे महत्व सांगितले.आणि आदिवासी संस्कृती,चित्रकला,वारली पेंटिंग हा ही वारसा घेण्यासारखा आहे.असे आपल्या मनोगतातून सांगितले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सूंदर आणि आकर्षक फलकलेखन विद्यालयाच्या उपशिक्षिका सुवर्णा भोर मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता आठवी तुकडी अ च्या विद्यार्थ्यांनी तसेच मार्गदर्शन वृषाली रौंदळ मॅडम यांनी सुंदर रित्या केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका वृषाली रौंदळ यांनी केले
तर आभार उपशिक्षक शाम बोराडे यांनी मानले.














