
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गडचिरोली : स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे बत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३१ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी राजेंद्र यादवराव सोनटक्के यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “आई” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
राजेंद्र यादवराव सोनटक्के हे गडचिरोली येथील रहिवासी असून ज्येष्ठ कवी आहेत. त्यांचा ‘काव्यसरीता’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. ‘ब्रम्हाकुमारीज’ या मासिकातून त्यांच्या कविता नियमितपणे प्रकाशित होत असतात. हिंदी व मराठीतून तसेच आध्यात्मिक विषयावरील जवळपास दिडशेच्या वर कवितांचे त्यांनी लेखन केलेले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या बत्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम धोंगडे, वंदना सोरते, प्रेमिला अलोने, तुळशीराम उंदीरवाडे, लता शेंद्रे, रेखा दिक्षित, सुभाष धाराशिवकर, सुनिता तागवान, मिलींद खोब्रागडे, मुरलीधर खोटेले, पी. डी. काटकर, संगीता ठलाल,प्रिती ईश्वर चहांदे, गणेश रामदास निकम, मंदाकिनी चरडे,रोहिणी पराडकर, किशोर बोरकुटे, सोनाली रायपुरे, विलास टिकले, राजेंद्र यादवराव सोनटक्के, वसंत चापले, पुनाजी कोटरंगे, उकंडराव नारायण राऊत, शैला चिमड्यालवार, राजरत्न पेटकर, खुशाल म्हशाखेत्री, रंजना चुधरी,केवळराम बगमारे, कु. भावना रामटेके, ज्योत्स्ना बन्सोड, सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.














