prabodhini news logo
Home ठळक बातम्या कंत्राटदारांवर कारवाई करा; अन्यथा उपोषण करू – विशाल बनचरे

कंत्राटदारांवर कारवाई करा; अन्यथा उपोषण करू – विशाल बनचरे

0
237


सागर शिंदे, वाशीम जिल्हा प्रतिनिधी – मालेगांव : वॉर्ड क्र 5 मधील साईनगर ते गजानन नगर रस्ता निकृष दर्जाचा व अंदाजपत्रकाला बगल देऊन काम केल्याबदल.
विशाल बनचरे यांनी जिल्हाधीकारी कार्यालयात निवेदन दिले असून कंत्राटदारांवर कायदेशीररित्या कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने नगर पंचायत कार्यालय मालेगांव येथे उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

लेखाशिर्ष – 4217 0603 अंतर्गत 2023 24 योजने अंतर्गत गजानन नगर ते साईनगर मेन रोड पर्यंत नाली सह सिमेंट कॉक्रिट रस्ता मजूर झालेला आहे, पण ठेकेदाराने त्या रत्यावर अंदाज पत्रकानुसार माहिती फलक लावले नाही,आणि रास्ता खोदकाम कमी प्रमाणात केले त्यात मुरूम टाकण्यात आला नाही, गीट्टा योग्य प्रमाणात टाकण्यात आला नाही, मेक्रो पोलिथिन 125 सुध्दा टाकण्यात आली नाही, व काही ठिकाणी रस्ता खोदकाम न करताच त्या वर बेड तयार करून मेन कोट टाकण्यात आला,रत्याची रुंदी 5 मीटर होती ती सुद्धा कमी 4 मीटर कऱण्यात आली असून साईडला नाल्या सुद्धा करण्यात आल्या नाही,नगर पंचायत बांधकाम विभागातील अधिकारी व मुख्याधिकारी साहेब यांना वारंवार फोन करून सादर माहिती देण्यात आली, दिनांक 05/02/2024 रोजी लेखी तक्रार सुद्धा देण्यात आली तरी आज पर्यंत रस्त्याची पाहणी करण्यात आली नसल्याची माहित विशाल बनचरे यांनी दिली असून सदर प्रकारची दखल घेऊन कायदेशीररित्या कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने नगर पंचायत कार्यालय मालेगांव येथे उपोषण करण्याचा इशारा अर्जदार विशाल बनचरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here