prabodhini news logo
Home चंद्रपूर बल्लारपूर येथे “हर घर सविधान घर घर सविधान” पोहोचवण्याच्या संकल्प अभियानाच्या शुभारंभ

बल्लारपूर येथे “हर घर सविधान घर घर सविधान” पोहोचवण्याच्या संकल्प अभियानाच्या शुभारंभ

0
216

बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – बल्लारपूर- आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा व सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर तालुका व शहर तर्फे आयोजित “हर घर सविधान घर घर सविधान” पोहोचवण्याच्या संकल्प अभियानाच्या शुभारंभ करण्यात आले .

सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी कडून सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन, संविधानाची प्रास्ताविका वाचून “हर घर संविधान” “घर घर संविधान” अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या कार्यक्रमाला खूप नागरिकांनी हजेरी लावली व या उद्घाटनाच्या निमित्ताने नागरिकांना संविधानाची पुस्तक वितरित करण्यात आले जवळपास 500 लोकांनी संविधानाची पुस्तक स्वीकारून संविधानाची माहिती सुद्धा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते देण्यात आली.
या ऐतिहासिक घटनेच्या दिवस 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय संविधानाच्या 75 वर्ष पूर्ण होत असून यंदाच्या वर्ष हा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात यावा अशी सूचना नागरिकांना देण्यात आली
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. मधुकर उराडे जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर, अँड.अक्षय लोहकरे जिल्हा महासचिव, प्रकाश तोहोगावकर गोंडपिंपरी तालुका अध्यक्ष, सत्यभामा भाले जिल्हा सल्लागार, गायत्री रामटेके शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, ॲड.रमण पुणेकर भारतीय बौद्ध महासभा हे उपस्थित होते..
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी,वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी ,भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अभिलाष चुनारकर तालुकाध्यक्ष बल्लारपूर वंचित बहुजन युवा आघाडी, नम्रता ताई साव तालुका अध्यक्ष बल्लारपूर महिला आघाडी, अश्विन शेंडे जिल्हा सदस्य चंद्रपूर, रेखाताई पागडे शहराध्यक्ष महिला आघाडी, शुभम नागापूर शहराध्यक्ष युवा आघाडी,शुभम सोनटक्के शहर सदस्य युवा आघाडी , वंचित बहुजन आघाडी ,वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडीने यशस्वी केला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here