prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शब्द फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शब्द फुले

0
13

शब्द फुले ओठी उमलती
मनामध्ये सुगंध पसरविती
भावनांचे रंग घेउनी
हळुवार हृदयी जाऊनी..ll

शब्द कधी सुगंधित वारा
शब्द कधी प्रेमाचा तारा
शब्दांनी नाते जुळते
शब्दांनी मन ही फुलते…ll

शब्द कधी गोड झुळूक
शब्द कधी शांत सुख
शब्दांनी हास्य खुलते
शब्दांनी दुःख विरते..ll

शब्द कधी दीप उजळती
अंधाराला दूर सारती
शब्द कधी आशा बनती
नव जीवनाची चाहूल देती..ll

शब्द फुले जपा मनाशी
गंध राहू दे प्रत्येकाशी
शब्दात असते जादू भारी
शब्द फुलेच सुंदर सारी..ll

उषा रामाजी ढोके (सौ.भुरे.)
ब्रम्हपुरी, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here