prabodhini news logo
Home चंद्रपूर राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत चंद्रपुरातील प्रेम जरपोतवार ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत चंद्रपुरातील प्रेम जरपोतवार ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

0
116

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने आणि ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमीत्त वणी येथील,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय श्री गुरुदेव सेवा मंडळ, सावर्ला, ओबीसी जातिहीन जनगणना समिती, वणी-झारी-मारेगाव यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन खंडोबा-वाघोबा देवस्थान सभागृह वणी येथे करण्यात आले होते.

वक्तृत्व स्पर्धेला वर्तमान काळातील देशापुढील ज्वलंत समस्या विषय होता ज्यात स्पर्धकांना सात मिनिटांचा बोलण्यासाठी अवधी देण्यात आला होता, ज्यामध्ये चंद्रपूरच्या प्रेमने विषयाची अतिशय सुंदर अशी मुद्देसुत मांडणी केली, व आपल्या वेगळ्या शैलीत वक्तृत्व सादर करून परिक्षकांचे मन जिंकलीत.

आणि राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रेमला प्रथम क्रमांकाचा मान देऊन त्याला रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here