मनिषा कायंदेंना महिला आयोग अध्यक्ष पदावर घेण्याची मागणी – अमृता भंडारी

0
52

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – पुणे : बदलापूर मध्ये घडलेली घटना ही शाळा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणणारी आहे. अशा शाळा संचालकांवर सर्वप्रथम गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. मुलींच्या सुरक्षेची कोणतीही जबाबदारी न घेता केवळ शाळा म्हणजे पैसा कमावण्याचे साधन समजणाऱ्या संचालक आणि कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कायद्याचा धाक बसत नाही तोपर्यंत हे असंच चालत रहाणार . महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री श्री दिपक केसरकर यांनी मंत्री झाल्यापासून किती शाळांना भेटी दिल्या, किती शाळांचे ऑडिट केले, किती शाळांवर कारवाई केली की फक्त प्रशासनावर शिक्षण मंत्री असल्याचा रूबाब गाजवत आदेश दिले इथ पासून सुरवात झाली पाहिजे. एवढ्या चिमुरड्यांचा विनयभंग करणारी विकृत मानसिकता का निर्माण होतेय या बाबतीत मानसोपचार तज्ज्ञांची अभ्यास समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गठित करावी आणि वारंवार घडणार-या अशा घटनांच्या मुळाशी जावं केवळ लाडली बहीण सारख्या अर्थव्यवस्थेचं दिवाळं काढणाऱ्या योजना राबवून काही होणार नाही. अशा योजना म्हणजे या तोपर्यंत वांझोट्या ठरतील जो पर्यंत सरकार म्हणुन प्रश्नांच्या मुळाशी जाऊन प्रश्नांची उकल होणार नाही. नाशिक नांदूर नाक्यावर झालेल्या एका बालिका अत्याचार प्रकरणात मी स्वतः नऊ दिवस आमरण उपोषण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केले होते. महिला क्रांती मोर्चा च्या वतीने मावळ तहसील कार्यालयात मोर्चा काढला होता, एका चार वर्षांच्या पालावर रहाणाऱ्या बालिकेवर सचिन हिरामण पाटील नावाच्या चाळीस वर्षांच्या इसमाने बलात्कार केला होता. तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी यांनी कारवाई चे आदेश दिले होते पण पुढे काय झाले याचे कोणतेही अपडेट जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले नाहीत आज या गोष्टीला दहा वर्षे उलटून गेली यावरून प्रशासन महिला अत्याचारांच्या बाबतीत किती उदासीन आहे हे दिसून येते. आमच्या लहान मुली आम्ही कोणाच्या भरवशावर शाळेत पाठवायच्या शाळा सुरक्षित नाहीत, समाज सुरक्षित नाही, राष्ट्रीय खेळाडू सुरक्षित नाही. राजकीय नेत्यांवर विनयभंग आणि बलात्काराचे गुन्हे नोंद आहेत पण कारवाई होत नाही तीथे सामान्य माणसाचा टिकाव कसा लागणार. संभाजी भिडे यांनी टिकली लाव सांगितले तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा गाजावाजा करणारांना संस्कारापेक्षा स्वातंत्र्य महत्वाचे वाटते. मुलींना तोकडे कपडे घालून मिरवण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्यापेक्षा राजकारणी आणि सेलिब्रिटींना स्वैराचार महत्त्वाचा वाटतो. बिग बॉस सारखे कार्यक्रम आणि सैराट सारखे चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात कोणती भर घालत आहेत याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभ्यास केला पाहिजे. महिला बाल विकास ने कधी शाळांचा दौरा केला का याची चौकशी झाली पाहिजे, महिला आयोगाची खुर्ची राजकीय व्यक्तींना लाल दिव्याच्या गाडीतून फिरणे आणि एअरकंडीशनिंग ऑफिस मध्ये बसून आदेश काढण्यापासुन यातून वेळ काढला तर विकृत मानसिकता ठेचून काढायला वेळ लागणार नाही त्यासाठी मनिषा कायंदे सारख्यांना महिला आयोगावर संधी द्या. राजकारणात आरोप प्रत्यारोप करून प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याची हौस पूर्ण करणारांची सेवा समाप्त करा आमच्या लेकीबाळी धोक्यात आहेत अशा शब्दांत महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला क्रांती मोर्चा च्या अध्यक्षा अमृताताई भंडारी यांनी भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here