prabodhini news logo
Home रत्नागिरी आजचा लेख – अन्याया विरुद्ध – एक आवाज

आजचा लेख – अन्याया विरुद्ध – एक आवाज

0
124

आपल्या सर्वाना माहिती असेलच सध्या ऑगस्ट महिना माणूस जातीला काळिमा फासणारा ठरतोय. याच काही दिवसात स्त्रियांवर जास्त अत्याचारच्या घटना उघडकीस आल्यात. आपल्या माता भगिनींचे सुरक्षित फिरणे अवघड झालेय. प्रत्येकाने आपल्या मनाला विचार आपली आई,आपली बायको,आपली बहीण,आपली मुलगी खरंच सुरक्षित आहे का?
सदर झालेल्या घटनांवर दुर्लक्ष न करता त्या विरुद्ध आवाज उठवणे ही आपली जबाबदारी नाही का? भारत माझा देश आहे. सारे भारतीय
माझे बांधव आहेत,हे फक्त प्रतिज्ञा आणि वाचना पुरताच का? मग आपल्या देशात स्त्रियांनावर असे अत्याचार होताना आपण अजून शांत का?
मुलीचा जन्म झाला कि लक्ष्मी जन्माला आली, पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणणाऱ्या आपल्या देशात, आपल्या संस्कृतीत आपल्याच माता भगिनी सुरक्षित नाही. बालपण भविष्याचा पाया असतो असं म्हणतात,याच वयात हे विकृत कृत्य हे पाप करणाऱ्या वृत्तीना,नराधमांना जागीच ठेचून समाजातुन नष्ट करायला पाहिजे तेव्हाच आपल्या माता भगिनी समाजात सुरक्षित फिरतील, वावरतील.महिला सर्व क्षेत्रात पुरुषांसवे आघाडीवर आहेत पण खेद या गोष्टीचा आहे कि महिला अजूनही सुरक्षित नाहीत.सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण विचारात आणि आचरणात घेऊन स्वराज्य या शब्दाची व्याख्या पुन्हा समजून आपल्या जीवनात अंमल करावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्यच नव्हे तर त्या स्वराज्याचे सुराज्य कसे होईल हे देखील पाहिले .. आणि तोच आदर्श सगळ्यांनी ठेवला पाहिजे ..

एक पाऊल जबाबदारीचे स्त्रीच्या रक्षणाचे

लेखक ओमकार अशोक नाचरे
रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here