
डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक यांच्या हस्ते संपन्न.
गिरड प्रतिनिधी : दिनांक 6 सप्टेंबर 2024 ला राष्ट्रसंत गाडगे महाराज सभागृहामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व गुण गौरव सोहळा नुकताच पार पडला यावेळी उपस्थित कामगार नेते डॉक्टर उमेश जी वावरे वैज्ञानिक. तसेच गिरड ग्रामपंचायतचे सरपंच श्री राजूभाऊ नौकरकार. निर्भिड लोक क्रांतीचे संपादक व सकाळ वृत्तपत्राचे वार्ताहर गजाननजी गारघाटे सर. समाजसेवक विनोद भाऊ येनोरकर. गजू भाऊ धात्रक. राजूभाऊ बोबडे. इरविंद भाऊ तामगाडगे. व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग यावेळी उपस्थित होते. डॉक्टर उमेश वावरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व प्रगतशील शेतकरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ उमेश वावरे यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांना एक ऊर्जा त्यांच्यात कशी निर्माण होईल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले व पुढील वाटचालीस गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विकास विद्यालय गिरड चे विद्यार्थी S.S.C. परीक्षा उत्तीर्ण होऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला यामध्ये पियुष सुधाकर मोटघरे 92.60%. समीक्षा खुशाल गाठे 86.60%. किंजल संजय पानबुडे86.20%. साक्षी संजय वांदिले 86.60%. जिया देवानंद लोहकरे84.80%. तसेच H.S.S.C. परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. कल्याणी रमेश कापटे.74.50% सलोनी चंद्रभान लोहोट 73.00% तसेच जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा गिरड चे विद्यार्थी श्रुती विकास वाघे वर्ग 7वा प्रथम क्रमांक व समीक्षा रमेश बावणे वर्ग सातवा द्वितीय क्रमांक घेऊन या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे व आई-वडिलांचे गिरड गावाचे तालुक्याचे नाव जिल्ह्यात लौकिक केले.














