prabodhini news logo
Home चंद्रपूर वडीलधाऱ्या व्यक्तींना आपुलकीची वागणूक द्या. – कुंदन खोब्रागडे

वडीलधाऱ्या व्यक्तींना आपुलकीची वागणूक द्या. – कुंदन खोब्रागडे

0
130

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर – संकल्प योगा केंद्र इंदिरानगर, चंद्रपुर येथे आयोजित गणेश कान्होलकर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने संपूर्ण योगा टीमच्या वतीने दि.१४ सटेंबर २०२४ ला साजरा करण्यात आला. यावेळी, सामाजिक चळवळीत हिरीरीने भाग घेणारे सामाजिक कार्यकर्ते, संकल्प योगा केंद्राचे केंद्रप्रमुख तथा संचालक कुंदन सतीश खोब्रागडे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, आपण सर्वांनी वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करायला पाहिजे. आयुष्याची साठी पूर्ण झाल्यावर आयुष्यात एकटेपणा जाणवायला लागतो, कारण घरातील प्रत्येकजण जबाबदारी सांभाळताना आपापल्या कामात व्यस्त असताना घरातील वृद्ध कुठेतरी एकटेच जीवन व्यतीत करीत असताना समाजात बघायला मिळतात. आवश्यक ते बोलणे वेळेत न झाल्याने त्यांचा चिडचिडेपणा वाढतो आणि घरात कलह निर्माण व्हावे लागतात. शेवटी घरातल्या सर्वांना वाटायला लागते की ‘हे म्हातारं जरा जास्तच बडबड करायला लागलं’. त्यामुळे या सर्व गोष्टी टाळाव्या म्हणून वडीलधाऱ्या व्यक्तींना (वृध्दांना) आपुलकीची वागणूक देणे अत्यंत आवश्यक आहे. घरात जेव्हा वृद्धांचा आनंदाने खळखळून हसण्याचा आवाज येतो, तेव्हा वाटत की हे घर किती आनंदी आणि सुख-समृध्दीने भरलेले आहे.” “संकल्प” इंदिरानगर येथे डॉ. अशोक वासलवार सर यांच्या संकल्पनेतून या वृद्धांचा एकटेपणा दूर करण्याकरिता दररोज सायंकाळी ६-७ वाजता “वृद्धविरांगुळा” हा उपक्रम राबविला जातो. समाजातील प्रत्येक तरुणांनी आपल्या घरातील वृध्दांना या उपक्रमात सामील करावे. असे आवाहन सुद्धा या प्रसंगी करण्यात आले. संगीतमय योगाच्या सानिध्यात हा वाढदिवस साजरा करून गणेश यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या आयोजनात चिंतामण येवले, नानाजी चटकी, विलास पिंपलकर, हेमराज चौधरी, दौलत पंडीले, रोहिदास बिस्वास, नानाजी हजारे, यांनी सहकार्य दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here