prabodhini news logo
Home चंद्रपूर माजी जि. प . सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी घेतली गणेशपूर – चिचखेडा...

माजी जि. प . सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी घेतली गणेशपूर – चिचखेडा येथील मृतकांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

0
128

११ सप्टेंबरला जिवंत तारेच्या स्पर्शाने 4 शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला होता.

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – वन्य प्राण्यांपासून शेताचे सरंक्षण करण्याकरीता झटका मशीनचा तार लावण्याच्या कामा करीता गेलेल्या प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत व पुंडलीक मानकर या चौघांचा जीवंत विद्युत तारांशी संपर्क आल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना ११ सप्टेंबरला २०२४ ला ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर जवळील रूद्रापूर बीट कळमगाव शेतशिवारात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा परसली. घटनेची माहिती मिळताच मेंडकी-गणेशपूर क्षेत्राचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी त्याच दिवशी मृतकांना ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता आणले असता रुग्ण्यालयात भेट दिली व स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांना सूचना करत शवविच्छेदन तात्काळ करवून घेतले.
११ ऑगस्ट रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्याला हादरा बसला आहे. मृतकांच्या परिवाराला धीर देण्यासाठी माजी जि. प . सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी गणेशपुर व चिचखेडा येथे मृतकांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले . मृतकांच्या कुटुंबियांची विचारपूस करून यापुढे कुठलीही मदत लागली तर मी तुमच्या सोबत आहे. असा धीर त्यांनी यावेळी दिला.
_गणेशपूर येथील मृतक प्रकाश राऊत, नानाजी राऊत, युवराज डोंगरे हे घरातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे घरावर दुःखाचे डोंगर कोसळलेले आहे. माजी जि. प . सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी गणेशपूर येथील राऊत परिवार व डोंगरे परिवार यांची भेट घेत मी तुमच्या सोबत नेहमी उभा आहे. असा धीर दिला. यावेळी त्यांच्या सोबत , उमेश धोटे सरपंच चौगान, वखार खान सामाजिक कार्यकर्ता, मनोहर गजबे मा.सभापती कृ.उ.बा.स. ब्रह्मपुरी,संजना घुटके सरपंच ,लोकेश चौके उपसरपंच,भास्कर राऊत,संजय घुटके,रामहरी राऊत, खुशाल गुरुनुले, किसन ढोरे, विनोद वसाके, दिवाकर ठाकरे, दयाराम कुंभरे, दिगांबर बावणे, सुरेश वसाके, विजय मानकर, नंदू हनवते, ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिचखेडा येथील 65 वर्षीय पुंडलिक मानकर हे घरातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे घरावर दुःखाचे डोंगर कोसळलेले आहे. माजी जि. प . सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी चिचखेडा येथे मानकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.

यावेळी त्यांच्या सोबत उमेश धोटे सरपंच चौगान, वकार खान, सरपंच , उपसरपंच, प्रशांत मानकर ग्रा. पं. सदस्य, देवेंद्र मानकर, मन्साराम मानकर, निलकंठ मानकर, उमेश मानकर, निरंजन चौधरी, संदीप चौके, अक्षय चौधरी, यांच्या सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here