उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादीका प्रबोधनी न्युज 9921400542 – अचलपूर ता . ईसापूर येथिल अमोल ईश्र्वरधर ठाकरे वय वर्ष 44 तथा मयूर गजानन ठाकरे वय वर्ष 24 हे दोघेही मंगळवार दिनाक सतरा रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सूमारास आसेगाव पोलीस स्टेशन हद्द तील येलकी पूर्णानगर परिसरातील पूर्णा नदीवर घरगूती गणपती विर्सजनासाठी गेले असता पूर्णा नदीपाञाच्या प्रवाहात वाहून गेल्याने या दोन यूवकाचा मृत्यू झाला.
अचलपूर ता.पथ्रोठ पोलीस स्टेशन हद्दीतील ईसापूर गावातील गणेश भंत्कानी अनंत चतूर्दशी असल्याने पूजा अर्चना झाल्या नंतर अमोल ईश्ररधर ठाकरे, एवम मयूर गजानन ठाकरे यांनी आपल्या घरच्या गणपती सह गावातील घरगूती गणपती एकञ करून ट्रॅक्टर मध्ये पूर्णानगर येथे पूर्णा नदीपाञात विर्सजनासाठी पोहचले विर्सजनाची विधी करत असतांना हे दोघेही नदीच्या खोल पाञात वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली शोधाशोध सूरू झाली तात्काळ पोलीस बचाव पथकालाही माहीती देण्यात आली राञी खूप वेळ पर्यत शोध लागला नाही दि. 18 रोजी सकाळी नदी काठाने शोध मोहीम राबविली असता मयूर चा मतदेह घटना स्थळावरून तीन कि मी अंतरावर असणारा वाठोडा हिम्मतपूर गावाजवळ नदी पाञात तर दूसरा अमोल ठाकरे चा येलकीच्या नदीपाञात पूलाजवळील परिसरात आढळून आला दूर्घटनेत बूडून मृत्यू झाल्याने अमोल ठाकरे ग्रामपंचायत कर्मचारी तर मयूर ठाकरे हा अंजनगाव सूर्जी येथे खाजगी बैॅक मध्ये कार्यरत होता अमोल तथा मयूर याच्या अकालीन मृत्यूने ईसापूर परिसरात शोक संवेदना व्यत्क केला घटना स्थळी आसेगाव पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी सह ग्रामस्थान दाखल झाले होते.

