तिघांवर केला गुन्हा दाखल.
प्रशांत रामटेके प्रबोधिनी न्युज – बाळापुर गल्लीत राहणारे वकील गोपाळरेड्डी कोनरेड्डी कोटावाड यलम हे विद्यमान दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर धर्माबाद येथील न्यायालयाच्या कामकाज संदर्भात निघत असताना दि. 13 सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी साडेअकरा वाजता फिर्यादीने आपल्या घराचे कुलूप लावताना, शेजारील आरोपी क्रमांक. 1 सुधाकररेड्डी गंगारेड्डी यांनी अर्वाची भाषेत शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, कपडे फाडले व जीव मारण्याची धमकी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आरोपी क्रमांक 2. पोतरेड्डी चा मुलगा व आरोपी क्रमांक 3. पोतरेड्डी गंगारेड्डी यांनी मिळून मारहाण केली. माझे काहीही कारण नसताना विनाकारण माझ्यावर हे लोक शिवीगाळ करून मारहाण करीत असताना भुमेश येणंगंटीवार, मुपडे व चिकाळे यांनी व गावातील इतर लोकांनी सोडूवणुक केली आहे. अशी तक्रार वकील गोपालरेड्डी दिल्याने पोलीस स्टेशन येथे वरील तिघांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक०२६७/२०२४ प्रमाणे भारतीय न्याय संहिता २०२३ कलम२ ९६,११५(२), ३५१(२),३५१(३), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महायुती सरकारच्या “लाडकी बहीण’ फसवी योजनेची अखेर पोलखोल – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
सदर आरोपी फिर्यादीच्या घराच्या पाठ भिंत लगत पाठीमागे शेजारी असून वकिलावरच हल्ला होत असल्याने सामान्यच काय अशा प्रकारची भावना जनतेतून होत आहे. पोलीस निरीक्षक धर्माबाद बाळासाहेब रोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पुढील तपास चालू आहे.
पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – ना. सुधीर मुनगंटीवार

