
मा.कुणाल भोईर
संविधान रक्षक
बहुजन विचारांचा पगडा तयावर
भीम विचाराचा चेला
संविधान नावं आहे बंगल्याचे
विचारही तसेच आणि तेच
कुणी निंदावे कुणी वंदावे
फरक पडणार नाही,
क्रांतीकारी विचार आपण
स्वीकारला…
बुद्ध धम्म संघ
वाट ती निर्मल्याची
शांतिदूत बुद्ध भगवान
साक्ष आहे घरात विराजल्याची…
शिका संघटित व्हा
संघर्ष तुम्ही करा रे
एकतेचे पाईक व्हा
बोध तुम्ही घेतला रे..
वाढदिवस हा तुमचा
गरुड पंख भरारी
बोध देई आयुष्याचा
भीम बाणा तुमचा करारी…
आयुष्याचे सहस्त्रक व्हावे
झोळी पुण्यकर्माची भरावी
देई शुभेच्छा तुम्हाला
आयुष्याला झळाली यावी..
कवियत्री ऋतुजा आहिरे संगमनेर














