कुरखेडा शहरामध्ये मोठया गाजावाज्यात जनसंवाद परिवर्तन यात्रा रॅली मोठया उत्साहात

0
126

कुरखेडा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 21/09/2024 ला काँग्रेस पक्षाच्या डॉ. शिलू चिमूरकर काँग्रेस कार्यकर्त्या आरमोरी विधानसभा क्षेत्र,यांच्या नेतृत्वात, कुरखेडा शहरामध्ये मोठया गाजावाज्यात, मोठया उत्साहात, जनसंवाद परिवर्तन यात्रा रॅली काढण्यात आली बसस्थानक पासून ते किसान मंगल कार्यालय पर्येंत काढण्यात आली या मध्ये मोठया संख्येने शेतकरी, स्थानिक नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला,डॉ. शिलूताई चिमुरकर यांनी सामान्य जनतेशी संवाद साधत त्यांच्या शिक्षण, आरोग्य,वीज अश्या विविध विषयावर चर्चा केली यावेळी,मा. जयंतजी हरडे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली, मा. नवनाथजी धाबेकर जेष्ठ कार्यकर्ते, युवा नेते, पिंकूभाऊ बावणे, महादेवजी कुमरे,प्रमोद दोनाडकर, देवा सहारे,पुष्पा कोहपरे महिला तालुका अध्यक्ष देसाईगंज,गितबाई नाकडे,वैष्णवी आकरे, रुकसाना शेख, सोमेश्वर वालदे,आदी काँग्रेस कार्यकर्ते, उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here