नि:शुल्क बौद्ध धम्मीय उपवर-वधू परिचय मेळावा

0
257

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – माता रमाई बुध्दिझम परिचय, ब्रम्हपुरी यांच्या विधमाने दि. 06 आक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे निःशुल्क बौद्ध धम्मीय उपवर-वधू परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भस्तरीय बौद्ध धम्मीय मेळाव्यात उपवर-वधूंचा परिचय होणार असून. त्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपवर-वधूंची नोंदणी मेळाव्याच्या ठिकानी सकाळी 10. 00 ते 11. 00 च्या दरम्यान मेळाव्याच्या दिवशी करण्यात येणार आहे. उपवर-वधूंनी मेळाव्यात येतांना एक फोटो सोबत आणावा.

या मेळाव्यात उपवर-वधू , घटस्फोटीत, विधवा, विधुर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन रमेश बागडे, घनश्याम रामटेके यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here