हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा कारंजा शहर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने २३ एप्रिल रोजी स्थानिक जयस्तंभ चौक येथे तीव्र निदर्शने करून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात करण्यात आले.
यावेळी भारत माता की जय ! तथा पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भाजपा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजु पाटील राजे यांच्या सुचनेनुसार भाजपच्या कारंजा शहर अध्यक्ष सौ.प्राजक्ता माहितकर यांच्या नेतृत्वात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.तसेच भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावे अशी भावना व्यक्त केली.या प्रसंगी संचालन तथा प्रास्ताविक संदिप काळे यांनी केले. भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजीव काळे,अश्विनी सस्तीकर, शुभांगी कौंडण्य,अनिता कोळसे,प्रीती धाकतोड, शुभांगी रावळे,रजनी दहातोंडे,सोनाली विरूळकर, अर्चना देसाई,भाजप कामरगाव मंडळ अध्यक्ष संजय लाहे,संदीप कुऱ्हे, विनीत गोलेछा,जिग्नेश लोढाया,किरीट रायचुरा, अतुल धाकतोड,समीर देशपांडे,निलेश कडू,अमित संगेवार,मोहन पंजवाणी, जावेद कामनवाले,लक्ष्मण कालीवाले,प्रदीप लाहे, निखिल घुडे,विनय गुल्हाने, अरुण घोडसाळ,मयूर लळे, सविज जगताप,राम देशमुख, सुनील गुल्हाने,पंकज राय, रवी शहाकार,शंतनू बोरकर, किशोर सोळंके,अनंता राईतकर,गजानन खोडे, दीपक फड,श्रेयस लाहे, ब्रिज वानखडे यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

