prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्ल्यू वॉरियर्स ग्रुपच्या वतीने पाणपोईचे लोकार्पण

ब्ल्यू वॉरियर्स ग्रुपच्या वतीने पाणपोईचे लोकार्पण

0
133

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी – नवीन दहेली (लावारी): उन्हाच्या कडाक्याला सामोरे जाणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासा देणारा उपक्रम ‘ब्ल्यू वॉरियर्स ग्रुप’ तर्फे सुरू करण्यात आला आहे. नवीन दहेली (लावारी) येथे या गटाने एक शुद्ध पाण्याची पाणपोई उभारली असून, त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. तेव्हा ब्ल्यू वॉरियर्स चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अंकुश जिवणे, अमिश मेश्राम, विलास माउलिकर, संदिप निरंजने, पवन कुशवाह, करन झाडे, मंगेश जिवणे, अमित मुन, साहिल मेश्राम, अश्विन उपरे, नंदकिशोर कुमरे, अजय वागदरकर, धर्मेंद्र कुशवाह उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसोबत लावलेला फलक हा सामाजिक जाणिवेचा आणि समर्पणाचा परिचय देतो. ही पाणपोई उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मोफत शुद्ध पाणी पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here