सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कर्जत जामखेड मतदार संघात आता हपभ हनुमंत महाराज पावणे यांनी कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रतापितांच्या विरोधात बंड पुकारले आहे.
ह भ प पावणे महाराज पुढे बोलताना म्हणाले ज्यांनी दहा वर्ष सामान्य जनतेच्या आर्शिवादाने आमदार मंत्री पद भोगले तेच खुर्चीवर बसल्यावर सामान्य जनतेला विसरून गेले आहेत गेल्या दहा वर्षापुर्वी जे जनतेच्या पैशांवर निवडून आले होते ते आज अलिशान बंगल्यात गाडीत फिरत आहेत त्यांचा विकास झाला पण मतदारसंघातील लोकांचे प्रश्न कायम राहीले भक्त संप्रदायात उल्लेखनीय कामगिरी असणारे, कर्जत जामखेड मतदार संघात 20 हजार पेक्षा जास्त शिष्यगण तसेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्य करत असताना 60 हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणी करणारे, ओबीसी, बहुजनांच्या हक्क व अधिकारासाठी लढणारे हनुमंत महाराज पावणे हे कर्जत जामखेड मतदार संघ मध्ये निवडणूक लढवणार हे आता नक्की झाले आहे. कर्जत जामखेड मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये ते भेटी-गाठी घेताना पाहायला मिळत आहेत. आम्ही त्यांना संपर्क केला असता त्यांनी सागितले की कर्जत जामखेड चा विकास हे ध्येय समोर ठेऊन आजपर्यंत राजकीय व परमार्थिक जीवनात कार्य करत आलो आहे. येणाऱ्या निवडणुकीस सामोरे जाणेसाठी आमची आमच्या निष्ठावान कार्यकर्ते बरोबर बैठक चालु आहे सर्व मिळून लवकरच निर्णय घेऊ व ताकतीने या निवडणुकीमध्ये नक्कीच उतरू असे त्यांनी सांगितले.

