बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 रोजी वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूर तालुका व शहर तर्फे मा. तहसीलदार बल्लारपूर यांच्यामार्फत मा.महामहिम राज्यपाल, मा.गृहमंत्री तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
आरोपी अमोल लोडे कोरपना येथील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. उन्हाळ्यात तो अतिरिक्त वर्ग घेण्याच्या बाहण्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावत होता .यातच त्याने एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत होता .मात्र ती अल्पवयीन मुलगी भीतीपोटी कुणालाही सांगत नव्हती परंतु काही दिवसानंतर तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पिढीतचे परिवार हे पोलीस ठाण्यात धाव घेतली व गुन्हा दाखल केला .
आरोपी हा कोरपणा शहर युवक काँग्रेस चा अध्यक्ष असून त्याला पास्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. व लवकरात लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे.तसेच आरोपी अमोल लोडे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन देऊन मागणी करण्याकरिता उपस्थित सत्यभामा भाले जिल्हा सल्लागार, सुप्रिया चंदनखेडे जिल्हा सचिव,नम्रता साव तालुका अध्यक्ष,प्रज्ञा नमनकर तालुका संघटिका, वंदना पुणेकर तालुका कोषाध्यक्ष ,रेखा पागडे शहराध्यक्ष, रीना कांबळे, वत्सला तेलंग,आशा भाले, नंदा देशभ्रतार ,निर्मला पाझरे, शालिना जयकर ,शीला बोरकर, तसेच युवा आघाडी जिल्हा सदस्य अश्विनी शेंडे ,सुदेश शिंगाडे व उमेश कडू शहराध्यक्ष, प्रशांत सातकर उपाध्यक्ष ,अभिलाष चूनारकर तालुका अध्यक्ष युवा ,शुभम नागापुरे शहर अध्यक्ष युवा आणि इतर पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

