महादजी शिंदे विद्यालयाला उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित

0
202

सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर – श्रीगोंदा तालुक्यातील महादजी शिंदे विद्यालयाला आज रयत शिक्षण संस्थेचा दरवर्षी दिला जाणार उपक्रमशील शाळा पुरस्कार संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी, माननीय बाबासाहेब भोससाहेब, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे, सचिव विकास देशमुख, संस्थेचे संघटक अनिल पाटील, सहसचिव मेनकुदळे, सहसचिव बी एन पवार, कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते देण्यात आला हा पुरस्कार हिरडगावचे सुपुत्र व महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दिलीप भुजबळ रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी व हिरडगाव गावचे सुपुत्र नवनाथ बोडखे यांनी स्विकारला विशेष म्हणजे गेल्या वर्षी दिला जाणारा पुरस्कार सुद्धा दिलीप भुजबळ सरांच्या कार्यकाळामध्येच छत्रपती विद्यालय घोगरगाव या शाखेत हा पुरस्कार मिळाला होता पुन्हा एकदा या वर्षीचा पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून महादजी शिंदे विद्यालयाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात भुजबळ सरांचा सिंहांचा वाटा आहे.
यावेळी महादजी शिंदे विद्यालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हिरडगाव चे सामाजिक कार्यकर्ते संपतराव दरेकर माजी सरपंच रामभाऊ गुणवरे काष्टी सोसायटी माजी मॅनेजर बाळासाहेब दरेकर हिरडगाव ग्रामपंचायत चे सरपंच दिपाली दरेकर उपसरपंच अमोल दरेकर माजी उपसरपंच चिमाजी दरेकर माजी सरपंच सुनिता दरेकर सदस्य विद्या बनकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here