
धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४)- दि. ०६/१०/२०२४ – चाळीसगांव शहरात नुकतीच नूतन प्रशासकीय इमारत कार्यरत झाली आहे.या इमारतीत तालुक्याचे ६ कार्यालय सुरू झाले आहेत. तालुक्यातील शेकडो लोक कामानिमित्त या कार्यालयात येत असतात.तालुक्याच्या मुख्य आणि भव्य अशा इमारतीत या महापुरुषांचे फोटो नसल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रशासकीय इमारतीत प्रवेशद्वाराजवळ विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांचे फोटो लावण्यात यावे अशी मागणी समता सैनिक दलाने केली आहे.समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांच्या नेतृत्वात तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मा.प्रशांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता मा.अनिल बैसाने यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा केली.
या महापुरुषांचे फोटो समता सैनिक दल कार्यकर्ते स्वखर्चाने लावतील अशी ही भूमिका मांडण्यात आली आहे. लवकरच या महापुरुषांचे फोटो लावण्यात येतील असे समता सैनिक दलातर्फे जाहीर करण्यात येत आहे.या चर्चेत तालुकाध्यक्ष आयु.महेंद्र जाधव ,शहराध्यक्ष विशाल जाधव , ज्येष्ठ कार्यकर्ते मनोज जाधव, शरद जाधव , सौ.सोनालीताई लोखंडे यांचेसह शिवाजी शिंदे , घनशाम बागुल व युवा नेतृत्व अवधेश बागुल हे सहभागी झाले होते.














