धुळे तालुका पोलीसांची कारवाही.
धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४) धुळे – दिनांक ०६/१०/२०२४ ला दिनांक-१२/०९/२४ ते २५/०९/२०२४ रोजीचे दरम्यान धुळे ते चाळीसगांव रोडवर विंचुर गावाचे शिवारात रोडवर पार्किंग केलेले काँक्रिट मिक्सर चे प्रोटान कंपनीच्या १८०००/-रुपये किंमतीच्या २ बॅटरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन घेवून गेले म्हणून तक्रारदार जितेंद्र प्रसाद यांच्या तक्रारीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक-६५३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम-३०३ प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.नमुद घटनेची माहिती प्राप्त होताच पोनि अभिषेक पाटील, यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षांत घेवून गुन्हयाच्या तपासाचे सुत्रे आपल्या हाती घेवून अधिनस्त असलेले पोहवा-किशोर खैरनार, पोहवा- कुणाल पानपाटील, पोहवा-उमेश पवार, पोहवा-ललित खळगे, पोहवा-मनोज शिरसाठ, पोका-विशाल पाटील, पोकॉ-धिरज सांगळे, यांना गोपनिय माहिती काढण्याच्या सुचना देवून मा. पोलीस अधीक्षक, धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून पारंपारीक व तांत्रीक पध्दतीने गुन्हयांच्या तपासाला गती देवून आरोपी शकिल शेख सलिम शेख ऊर्फ शकिल सेंधवा वय-३८ रा.बाबा नगर नटराज टॉकिज समोर ८० फुटी रोड, धुळे यांस अटक करुन सखोल विचारपूस केली असता नमुद आरोपीने गुन्हयाची कबुली देवून गुन्हयातील चोरलेली प्रोटान कंपनीच्या १८०००/-रुपये किंमतीच्या २ बॅटरी काढून दिल्या असुन त्यासोबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेला अपराध क्रमांक-६५४/२०२३ या गुन्हयाची देखील कबुली देवून त्या गुन्ह्यांत चोरलेल्या १५०००/-रुपये किंमतीच्या लिव फास्ट आणि एक्झिट गोल्ड कंपनीच्या २ बॅट-या काढून दिल्या आहेत.
तसेच नमुद आरोपी शकिल शेख सलिम शेख ऊर्फ शकिल सेंधवा याने त्याचे साथीदारांसह विविध ठिकाणांवरुन चारचाकी वाहनातून चोरुन नेलेल्या बॅटरी चोरी गुन्हयांची देखील कबुली दिली असुन या प्रकरणात आरोपीचे कब्जातून एकुण १२ बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. आरोपीने गुन्हा करतेवेळी आरोपीने वापरलेले चारचाकी वाहन ह्युन्डाई अॅसेंनट कार व त्याचे साथीदारांबाबत सुध्दा उपयुक्त माहिती दिल्याने वापरलेले वाहन व आरोपीचे साथीदार यांचे विषयी पुढील तपास धुळे तालुका पोलीस येथे सुरु आहे.

