
वणी तालूका प्रतिनिधि नरेश ठाकरे – वणी विधानसभा क्षेत्रातील सोमनाळा ता.वणी येथील अनेक युवकांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी प्रभावी होऊन महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत व वणी विधानसभेचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यप्रणाली प्रभावित होऊन आणि भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात सोमनाळा गावातील ६० युवकांनी भारतीय जनता पार्टी दुपट्टा टाकून पक्षांमध्ये स्वागत केले व भारतीय जनता युवा मोर्चाच्या शाखा फलकाचे अनावरण केले. व निंबळा गावातील सुपुत्र मेजर महेश विठ्ठल कोहळे १८ वर्ष देशसेवा करून आपल्या गावी सुखरूप परत आले या प्रसंगी त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा दिनकर पावडे,वणी विधानसभा संयोजक संजय पिंपळशेंडे,भाजपा उपाध्यक्ष नितिजी वासेकर,भाजपा तालुकाध्यक्ष गजानन विधाते,साखरकर, बांधुरकर, भाजपा तालुकाध्यक्ष युवा मोर्चा राहुल कुत्तरमारे,शाखा अध्यक्ष आशिष संकीलवार, शाखा उपाध्यक्ष आशिष पठाण,शाखा सचिव प्रमोद कालेकर शाखा कोषाध्यक्ष्य शुभम चटपल्लिवार सहसचिव सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.














