
संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा
गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी
जिवती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : – तालुक्यातील नावाजलेल्या स्व. सांगाडा पाटील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये वर्ग 12 वी मध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन संशयास्पद मृत्य झाल्याची घटना घडली आहे.
कोदेपुर येथील सांगाडा पाटील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये जिवती तालुक्यासह परिसरातील विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत असतात, परंतु संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या भोंगळ कारभारामुळे आज एका निरपराध विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने तालुक्यात संस्थाचालकाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
सदर शाळेच्या वसतिगृहाचे अधीक्षक दोन दिवसांपासून रजेवर गेले आहे, परंतु आपला चार्ज संबधित अधिकाऱ्याकडे न सोपवता त्यांनी मनमर्जीने रजेवर गेल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला.
सदर घटनेची तात्काळ चौकशी करून शाळेच्या संस्थाचालकांवर तसेच मुख्यध्यापक आणि वसतिगृहाच्या अधिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राजुरा विधानसभा अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केली आहे
पुढे जुमनाके यांनी शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात की जनावरे असा सवाल करत मागण्या पूर्ण न झाल्यास शाळेच्या आवारातच मृत्यदेह ठेवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्याध्यापकांना याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडविचे उत्तरे दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.











