
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातुन गतवेळी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकच कांग्रेस चा उमेदवार निवडुन आला होता. आणि तो केवळ नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी- त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघातुन.हा मतदारसंघ कांग्रेस चा प्रचंड मोदी लाटेतही बालेकिल्लाच होता व कांग्रेस च्या दारुण अवस्थेतही या मतदारसंघाने कांग्रेसचीच कायम पाठराखण केली आहे.हा इतिहास लक्षात घेऊनच कांग्रेस ची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकाचीं रांग लागली असुन येथुन उमेदवारी मिळवण्यात कोण बाजी मारत याकडे सगळयाचें लक्ष लागुन आहे.
आजमितीला येथुन कांग्रेस पक्षाचे हिरामन खोसकर हे आमदार आहेत.तर सन २००९ व सन २०१४ हया दोन्ही वेळेस कांग्रेस च्या आमदार सौ. निर्मला गावित हया होत्या.सलग पंधरा वर्षापासुन या मतदारसंघावर कांग्रेस पक्षाचा दबदबा आहे.
दरम्यान यंदा कांग्रेस चा उमेदवार कोण ? या बाबत मोठी उत्सुकता आहे.
विदयमान आमदार हिरामन खोसकर यांचेवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तर आमदार हिरामन खोसकर यांनी हा आरोप बिनबुडाचे आहेत असे ठणकावले आहे.
आमदार हिरामन खोसकर एकीकडे उमेदवारी दयायची तर दया, नाहीतर नका देऊ अशी आक्रमक भुमिका घेत पक्ष नेतृत्वाला शिंगावर घेतानां दिसत आहे तर दुसरीकडे कांग्रेस पक्षाशी प्रामाणीक असल्याचे सांगत, उमेदवारी नाही दिली तरी पक्षाचे काम करु व देईल त्या उमेदवारासाठी प्रचार करु असेही म्हणत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या भेटी घेऊन खळबळ माजवली आहे. हा पक्षाला ईशारा तर नव्हे कि नव्या सोयरिकीची तयारी तर नव्हे अशा खमंग चर्चा हल्ली सुरु आहे.
कांग्रेस कडुन आमदार हिरामन खोसकर यांचेसह माजी पंचायत समिती सभापती गोपाळा लहांगे, नगरसेविका उषा बेंडकोळी, डॉ. शरद तळपडे आदीसह अर्धा डझन पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारानीं कंबर कसली आहे.
दरम्यान एकीकडे उमेदवारी साठी तगडी स्पर्धा सुरु असतानांच ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईगतपुरी तालुका कांग्रेस मध्ये तीव्र दुफळी माजली आहे.
यात कांग्रेस तालुका अध्यक्ष पदावरुन वाद सुरु झाला असुन रमेश जाधव व समर्थकासह रामदास धांडे व समर्थकामध्ये तीव्र वाद पेटला आहे.यात जाधव गटाने धांडे यांची पक्षातुन हकालपट्टी केल्याचे म्हटले आहे.
ईगतपुरी तालुका कांग्रेस व गटबाजी हे समीकरण पक्के असुन तालुका कांग्रेस ला गटबाजीचा शापच आहे.
या तीव्र गटबाजीचा परिणाम निवडणुकीवर झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील एकमेव जागाही कांग्रेस गमावेल यात शंका नाही. त्यामुळे कांग्रेस ने एक होऊन काम करण्याची गरज आहे. अन्यथा आघाडीतील उ.बा.ठा व रा.कॉ.शरद पवार हे ही उदासीन होऊन अंग काढुन घेतील अशी साधार भीती व्यक्त होते आहे.














