युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमराज बावणे यांची मागणी
घुग्घुस प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : चंद्रपूरचे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचा तडीपाराचा आदेश रद्द करा अशी मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमराज बावणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्यावर राजकीय बळाचा वापर करीत तडीपाराची नोटीस बाजावून त्यांचे मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्यावर गोरगरीब लोकांच्या न्यायहक्कासाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे दाखल आहे. बल्लारपुर विधानसभा क्षेत्रात जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचा वाढत असलेला जनाधार लक्षात घेऊन एका राजकीय पक्षाने धसका घेतला आहे. जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी विविध आंदोलनेकरून जनतेला न्यायहक्क मिळवून दिला आहे.
निवेदन देतांना युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमराज बावणे, शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, शिवसेना उपशहर प्रमुख अनुप कोंगरे, शिवसेना उपतालुका प्रमुख योगेश भांदक्कर, शिवसेना नेते बाळू चिकनकर, वेदप्रकाश मेहता, रघुनाथ धोंगळे, नागेश तुराणकर, निखिल मोहितकर व शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

