स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त व जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात भारतीय कोयला खदान मजदूर संघाकडून परिचारीकांचा सन्मान करण्यात आला.वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका यांना महाराष्ट्राचा राज्य स्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल नर्सेस पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना विषेश सत्काराने सन्मानित करण्यांत आले.यामध्ये शाल श्रीफळ,बुके,मोमेंन्टो प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सोबत ६ परिसेवीका ३० अधिपरिचारीका व ४ ए. एन.एम.यांनाही पुरस्कुत करण्यात आले.हा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे घेण्यात आला.

