prabodhini news logo
Home चंद्रपूर लोणारा गावातील स्मशानभूमीच्या जागेवर गावकऱ्यांची एकता

लोणारा गावातील स्मशानभूमीच्या जागेवर गावकऱ्यांची एकता

0
246

आम आदमी पार्टीच्या पुढाकाराने मृत व्यक्तीला मिळाला सन्मान

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर- आम आदमी पार्टीच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा व तालुक्यातील लोणारा गाववासीयांच्या अथक प्रयत्नांमुळे लोणारा गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे गावातील एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांना योग्य स्थान मिळाले.

गेल्या काही काळात लोणारा गावात स्मशानभूमीच्या अभावी मयत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांना योग्य जागा मिळत नव्हती. या प्रश्नावर गावकऱ्यांनी आणि आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील लोकांनी आंदोलन केले होते, ज्यात “मयत प्रेत आंदोलन” करून प्रशासनाचे लक्ष वेधले गेले होते.

तथापि, आजच्या घटनेत मृत प्रेत स्मशान भूमी च्या नवीन जागेवर जळू नये म्हणून हॅप्पी 7 डेज हॉटेलचे मालक पप्पू ठक्कर यांचे हॉटेल स्मशान भूमी च्या बजुला लागून असल्या मुळे यांनी आपला रसूख दाखवून स्मशानभूमीच्या जागेवर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांच्या एकजुटीपुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि त्यांना तिथून पळ काढावा लागला.

गावकऱ्यांच्या या एकतेचे आणि आम आदमी पार्टीच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले जात आहे. या घटनांमुळे लोणारा गावातील नागरिकांच्या एकतेचा आणि लोकशाहीच्या विजयाचा संदेश पुढे आला आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, भद्रावती युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, तालुका अध्यक्ष सुरज खंगार यांनी यासाठी गावकऱ्यांचे आभार मानले आहेत आणि सांगितले आहे की, गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पार्टी पुढेही तत्पर राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here