सकल धनगर समाजाला सम्राट अशोक सेनाचा जाहीर पाठिंबा
अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन
अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- संपूर्ण महाराष्ट्रभर सकल धनगर समाजाचे वतीने धनगर जमातीला हक्कावे अनुसूचित जमातीचे आरक्षणाची अंमलबजावणी करावी खिल्लारे कुटुंबाचे धनगड बोगस जात वैधता प्रमाणपत्र रह करावे. धनगर जमातीचे अनुसूचित जमातीच्या आरक्षणावा शासन निर्णय त्वरित काढावा या मागणीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असून सकल धनगर समाज अकोलाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकोला येथे ढोल बजाव डफडे बजाव/घंटानाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले आहे.तरी शासनाने त्वरीत धनगर जमातीच्या आरक्षणा संदर्भात शासन निर्णय त्वरीत काढावा व धनगर समाजाला न्याय द्यावा या मागणी करिता आंदोलन या आंदोलनाला आमचा सम्राट अशोक सेनेकडून पाठिंबा दिला तात्काळ धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण करावे अशी आम्ही मागणी करतो.

