परळी तालुक्यात आदर्श आचारसंहितेची ऐशी कि तैशी! केंद्रीय निवडणूक आयोग याकडे लक्ष देईल काय ? – बालासाहेब जगतकर

0
106

परळी प्रतिनिधी:- परळी तालुक्यात आदर्श आचारसंहितेची ऐशी कि तैशी होत असून केंद्रीय निवडणूक कार्यालय याकडे लक्ष देईल काय अशी ही चर्चा येथील नागरिकांतून होताना दिसत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन 72 तासाच्या वर झाले असता ही परळी शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे पोस्टर्स व प्रचाराचे माध्यम आढळून येत असून याला एकमेव कारण म्हणजे स्थानिक चे अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हे याकडे लक्ष देतील काय कारण परळी शहर व तालुक्यातील तहसील कार्यालय पंचायत समिती व नगरपालिका येथील विविध अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात कारण सध्या होऊ घातलेल्या निवडणुका ह्या नी पक्षपाती व खुल्या वातावरणात झाल्या पाहिजेत यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश असून ज्या कार्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त अधिकाऱ्याचा कार्यकाळ झालेला आहे व जे अधिकारी स्थानिक चे रहिवासी आहेत अशांच्याही तात्काळ बदल्या करण्यात याव्यात असे आदेश असतानाही जिल्हा निवडणूक अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून केंद्रीय निवडणूक आयोग याकडे लक्ष देतील काय ? कारण परळी विधानसभेत आचारसंहिता लागली असतानाही याची अंमलबजावणी होताना दिसत नसून सत्ताधारी पक्षाच्या पायाखालचे भावले येथील अधिकारी बनल्याचे दिसत असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली असल्याची माहिती साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here