राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपाला ऐन निवडणुकीत आणखी एक मोठा धक्का…!

0
198

सिरोंचा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश…!

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली ग्रामपंचायत अंतर्गत रेगुंठा सर्कल येथील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)गटाचे अनेक जेष्ठ पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत अजय भाऊ कंकडालवार यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.

सदरहू पक्ष प्रवेश अहेरी येथील अजय कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला असून पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवोदित कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजय कंकडलवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुपट्टे अन् पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात इतर पक्षांचे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इंनकमिंग सुरू असल्याने याची फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रेगुंठा सर्कल येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी मडावी,नारायण डुरके,संपत सूनातकरी,श्रीनिवास दुर्गम,पार्वती झोडे,भारती अल्लुरी, ममता बोरकुट,पुष्पा जनगाम,पुष्पा सूनतकरी,वेंकटि कावरे,अनमंत बोरकुट, वेंकटी डूरके,लक्ष्मण डूरके,बालाजी अल्लूरी,सोमय्या चालुरी, राजम चोलुरी,चीनक्का सूनतकरी,सूर्यमला बंडला,पद्मा बंडाला,रोजा चालुरि,शांतक्का दुर्गम,प्रमिला रामटेके,सौजण्या दुर्गम,बायक्का दुर्गम, अंजली डूरके,राकेश चुक्का,महेंद्र मछावार,शंकर झाडे आदींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतले.

पक्षप्रवेशा दरम्यान अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा आलम,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,माजी जि.प. सदस्य अजय नैताम,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here