आजची स्त्री सुरक्षित आहे का? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कुणाला अर्ध्या रात्री हा प्रश्न विचारले तर याचे उत्तर नाहीच येते. कितीही स्त्री शिकली मोठ मोठया पदावर पोहचली तरी आजची स्त्री ही कुठंच सुरक्षित नाही.तिच्यावर अनेक जाच जुलूम होतच असतात. मग ती घरी असो की बाहेर तिला त्रास हा सहन करावाच लागतो.
कधी बदलणार हा विचार ?जेंव्हा प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी स्त्रीला समान दर्जा देतील तेंव्हा नक्कीच स्त्री सुरक्षित होईल. आणि तिला सुरक्षित राहत येईल कायद्याने तिला अनेक हक्क बहाल केले आहेत .स्त्रियांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी अनेक महान नेत्यांनी प्रयत्न केले, यात सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले न्यायमूर्ती रानडे
कर्मवीर भाऊराव पाटील, असे कितीतरी नाव घेता येते यांनी स्रियांना समान हक्क बहाल केले पण कर्मठ समाज आज ही जुन्या रूढी परंपरा गोचीड बसल्यासारखे चिटकून बसला आहे. स्रियांना आजही काही बंधने पाळावी लागतात. जस की तिच्या मासिक पाळीच्या काळात तिला पूजा अर्चा करता येत नाही. कारण तिला या काळात अपवित्र मानले जाते ,आणि त्यामुळे तिला कोणत्याही शुभ कार्यात सहभागी होता येत नाही.
जर झाली तर आपणास पाप लागते ही भावना निर्माण होते, म्हणून तिला शुभ कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. तसेच स्रियांना हा नियम आहे की तीसातच्या आता घरात पोहोचले पाहिजे, प्रत्येक वेळी स्रियांवर अन्याय होतो आणि ती स्त्री चुपचाप सहन करत असते,
जर हे चित्र बदलायचे असेल तर ही बंधनं मुलांवर घातली पाहिजे प्रत्येक आई वडीलानी ठरवलं पाहिजे की माझा मुलगा रात्री अपरात्री हा घरीच असला पाहिजे, असे चित्र जर घराघरात दिसून आले तर आजची स्त्री ही खरोखरच रात्री अपरात्री सुरक्षित घरी येईल . पण हे आमचे लाडाची मुले असतात म्हणून ती बाहेर, मुलं ही खोडकर असतात त्यामुळे असे वागले तर चालते ही भावना बदलली पाहिजे आणि जसा नियम मुलींना आहे तसाच नियम हा मुलाला लावला तर आजची स्त्री ही खरोखरच सुरक्षित राहील आणि थाट मानेने जीवन जगू शकेल. मुलगा म्हणून वेगळी वागणूक न देता दोघांनाही समान वागणूक व समान दर्जा दिला पाहिजे तरच स्त्री ही सुरक्षित राहील नाहीतर तीला अजूनही गुलामीचे जीवन जगावे लागेल
लेखिका प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

