शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम – कारंजा (लाड) : दि .22 ऑक्टोबर 2024 रोजी ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथील महेश भवन येथे दुपारी ठीक 2 वा.30 मिनिटांनी त्यांना मानणाऱ्या त्यांच्या समर्थकांचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यास सर्व कार्यकर्त्यांनी, दिवंगत आमदार आमदार राजेंद्र पाटणी साहेब वॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांना मानणाऱ्या मतदार संघातील सर्व त्यांचे स्नेही कार्यकर्ते,मित्र,सामाजिक कार्यात त्यांच्याकरीता वाहून घेतलेले व त्यांच्याप्रती निष्ठा असणारे सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे.अशी विनंती ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी केली आहे. मतदार संघात त्यांच्यासोबत राहुन पक्ष संघटनाचे काम करणारे व पक्ष मजबूत करण्यासाठी योगदान देणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहावे.या मेळाव्यास ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी उपस्थित सर्व मान्यवरांकडून मार्गदर्शन घेणार असून चाहत्यांचे आशीर्वाद घेणार आहेत. तरी सर्व मान्यवर स्नेही प्रेमी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे. स्वर्गीय आमदार राजेंद्रजी पाटणी,ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्याकडून झालेल्या मतदारसंघातील विकासात्मक कामांमुळे मतदार संघातील नागरिकांनी नेहमीच पाटणी परिवाराच्या हाकेला ओ दिला आहे, प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे याही वेळी त्यांनी मतदारसंघातील त्यांच्या स्नेहींना कार्यकर्त्यांना मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तेव्हा हा संदेश त्यांचे जाहीर निमंत्रण समजावे. कार्यक्रमास न चुकता उपस्थित राहावे. असे संजय भेंडे यांनी कळविले आहे.

