सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर – आज श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे वृद्धांना गरजुना आज संदीप दरेकर यांनी दिपावली निमित्त किराणा तसेच कपडे दिले आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतः ची मुलांना वृद्ध माणसाकडे पाहण्यासाठी वेळ नाही अशी अवस्था समाजात असताना संदीप दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून दर महिन्याला वृद्ध व गरजु व्यक्तींना किराणा व आजारी व्यक्तीला औषध उपचार दिले जातात या उपक्रमाने हिरडगाव व परिसरातील लोकांनी या तरुणांचे कौतुक केले आहे.
मा. संदिप (बापू) दरेकर यांनी गावातील वृद्धांचा मासीक कँम्प घेतला डॉक्टरांनी तपासण्या करुण सर्वांना गोळ्या औषधे दिले तसेच सर्व वृद्धांना दिपावली निमीत्त किराणा व कपडे वाटप करण्यात आले! सदर कार्यक्रमाला मा आवताडे सर ऊपस्थीत होते. त्यांनी सर्व लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले गेल्या ३२ महिण्या पासून अखंडीतपणे स्वखर्चाने वृद्धांना मदत करत आहेत! हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणतात आजपर्यंत कोणीही बरोबर काहीही घेऊन गेले नाही! हे सर्व नाशिवंत आहे आपल्या कमाईतला काही हिस्सा गरजूंना मदत करुन त्यांच्या चेहऱ्यावर जे हसु दिसेल तो आनंद दुसऱ्या कशातच नाही मी माझ्या ऐपतीप्रमाणे गोर गरीबांना मदत करत राहाणार त्यात कोणाताही हेतू नाही असे संदीप दरेकर यांनी सांगितले.
यावेळी हिरडगाव सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व संचालक व सर्व तरूण उपस्थित होते.

