prabodhini news logo
Home चंद्रपूर ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे डॉक्टरची मुजोरी; आम आदमी पार्टीची ठाम कारवाई

ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे डॉक्टरची मुजोरी; आम आदमी पार्टीची ठाम कारवाई

0
158

भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामीण रुग्णालयात असलेल्या एका डॉक्टरचे बेजबाबदार वर्तन समोर आले आहे. पेशंटसमोर टेबलवर पाय ठेवून असभ्य वर्तन करणाऱ्या या डॉक्टरने रुग्णांसमोर मुजोरीची परिसीमा गाठली आहे. या प्रकाराबाबत आम आदमी पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कारवाईसाठी त्यांनी पुढाकार घेतला.

चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार आणि ओम पारखी यांनी घटनास्थळी जाऊन त्या डॉक्टरला धडा शिकवण्याचे कार्य केले. डॉक्टरांच्या बेजबाबदार वर्तनाला विरोध करत, त्यांनी रुग्णालय प्रशासनाला यासंदर्भात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. या अगोदर सुद्धा ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे मद्य प्राशन करून एक डॉक्टर पेशंट ला तपासत होते त्या वेळी सुद्धा आम आदमी पार्टी द्वारा त्या डॉक्टर ला चेतावणी देण्यात आले असून सुद्धा यावेळी असे प्रकरण दिसत असल्यामुळे प्रश्न निर्माण होत आहे की सामान्य जनतेच काय होणार ?

आम आदमी पार्टी नागरिकांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर आहे आणि असे असभ्य वर्तन सहन केले जाणार नाही. आम आदमी पार्टी रुग्णांच्या हितासाठी व त्यांच्या सन्मानासाठी कटिबद्ध असून, यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here