ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – महायुती व म.वि.आ चे उमेदवार ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात निश्चित झाल्यानंतर अनेक नाटयमय घडामोडी घडल्या असुन, महायुतीकडे नेते व कार्यकर्ते यांचा महापुर लोटत असतानां दुसरीकडे म.वि.आ ला मात्र घरघर लागल्याचे चित्र दिसत आहे.
म.वि.आ.कडे विदयमान आमदार हिरामन खोसकर यांचे रुपाने प्रबळ उमेदवार असताना कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यसभा निवडणुकीत आमदार हिरामन खोसकर फुटल्याचा आरोप करत त्यांची पक्षातुन हकालपट्टी केली.त्यामुळे ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा नवा भिडु देण्याची नामुष्की म.वि.आ वर आली.त्यातही स्थानिक इच्छुकानां डावलण्यात आल्याने त्या इच्छुकानींही बंड केले आहे.
आमदार हिरामन खोसकर यांचेसोबत सहकार क्षेत्रातील दोन दिग्गज नेते संपतराव सकाळे व अँड संदिप गुळवे आपल्या शेकडो समर्थकासह बाहेर पडले हा कॉग्रेस ला मोठा धक्का होता.
त्या पाठोपाठ स्थानिक उमेदवार न दिल्याने अपवाद वगळता उरली सुरली कॉग्रेस ही बाहेर पडली आहे.
दुसरीकडे उबाठा शिवसेना गटाच्या उपनेत्या माजी आमदार सौ.निर्मला गावित यांनीही बंड पुकारले आहे, तर त्यांचेसोबत ईगतपुरी व त्रंयबकेश्वर चे तालुका प्रमुख, उप जिल्हाप्रमुख आदी दिग्गजही बाहेर पडले आहे. हा उबाठा गटालाही जबर तडाखा बसला आहे.
रा.कॉ.चे माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश नेते गोरख बोडके व उदय जाधव हे ही अजित पवार गटात असल्याने शरद पवार गटाची अवस्था केविलवाणी झाली आहे.
या सर्व नेत्यांमुळे महायुतीचे पारडे जड झाले आहे तर म वि आ ची अवस्था कार्यकर्ते देता का कुणी कार्यकर्ते अशी झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
या बिकट परिस्थितीत म वि आ कशी उभारी घेते याकडे आता सगळे लक्ष आहे.

