ब्रम्हपूरी शहरात विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली

0
142

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

विधानसभा निवडणुकीचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहचला आहे. अशातच आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच महाविकास आघाडी व घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारार्थ शहरातुन भव्य रॅली काढण्यात आली. आयोजित रॅलीची सुरवात शहरातील बाजार चौक येथील प्राचीन शिव मंदीरापासुन करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात, प्रचाररथ व बहुसंख्येने काॅंग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल आॅर्गनाईजेशनचे पदाधिकारी तथा महाविकासचे व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थिती लक्षणीय ठरली.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार वडेट्टीवार यांनी डोअर टू डोअर प्रचारातुन नागरिकांच्या भेटी घेतल्या. तर शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला. तसेच उपस्थित रॅलीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा विजयपर्व हा नारा देत महाविकास आघाडीकडून जनकल्याणासाठी प्रकाशित केलेल्या वचननामा, क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे याची माहितीपत्रके वितरीत करण्यात आली. शहरातुन निघालेल्या भव्य रॅली बाजार चौक ते फाशी चौक-रेणुका माता चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते काॅंग्रेस प्रचार कार्यालयापर्यंत पोहचून यावेळी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here