बार्शी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – बार्शी दि. 08- तालुक्यातील आगळगाव येथे महायुतीचे उमेदवार आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने रात्री 10 वाजेपर्यंतच भाषणास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, 10 वाजण्यापूर्वीच सभा आटोपती घेणे बंधनकारक असतानाही महायुतीची सभा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
निवडणूक कर्मचाऱ्याने याबाबत पोलिसात फिर्याद दिल्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम 223 अनुसार आयोजक सुहास डमरे यांच्याविरोधात विरोधक बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्राचारर्थ आगळगाव या ठिकाणी बुधवारी प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी, सभेसाठी ठरवून दिलेल्या वेळत सभा न घेता वेळेपेक्षा 45 मिनिटं अधिक सभा घेण्यात आल्याचं फिर्यादीने तक्रारीत म्हटलं आहे. निवडणूक कर्मचारी नागनाथ गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

