सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर ९८५८३२२४६६ – श्रीगोंदा तालुक्यात विधानसभेची रणधुमाळी चालू असताना आज दुपारी ४:३०वा श्रीगोंदा येथे घन:शाम शेलार यांनी विधानसभेतुन माघारी का घेतली यावर सविस्तर चर्चा करण्यात आली ते म्हणाले मी काॅग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात साहेब व प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे साहेब यांचा फोन आला व महाविकास आघाडीला अडचण होऊ नये काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष आहे मोठा पक्ष आहे व काॅग्रेस पक्षाने बंडखोरी करू नये भविष्यात पक्ष आपला नक्कीच विचार करून चांगली जबाबदारी सोपवुन राजकीय पुनर्वसन केले जाईल आज पर्यंत मी कुणाच्याच चहाच्या कपाला मिंदा नाही व घनश्याम शेलार यांनी सर्व उमेदवारांना आहावान केले की मी दोन दिवसांत माझी राजकीय भुमिका स्पष्ट करणार आहे त्या अगोदर सर्व उमेदवारांनी मी कुणाबरोबर आर्थिक तडजोडी केल्याका या विषय आपल्या आपल्या भुमिका स्पष्ट कराव्यात नाही तर मी माझ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावून पाठिंबा देण्याविषयी भुमिका स्पष्ट करणार आहे आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देण्याविषयी विचारले असता दोन दिवसांत बैठक बोलावून ठरवु यावेळी संजय आनंदकर श्रीपाद ख्रिस्ती सुहास झेंडे काही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

