prabodhini news logo
Home ठळक बातम्या गांधीनगर ब्रम्हपुरी येथील महिलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गांधीनगर ब्रम्हपुरी येथील महिलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
218

युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

ब्रम्हपुरी तालुक्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंजावात व काँग्रेस पक्षाच्या विचार सरणीला प्रेरित होऊन ब्रम्हपुरी शहरांतील गांधीनगर प्रभागातील अनेक महिला कार्यकर्त्यांनी आज विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर पार पडलेल्या ब्रम्हपुरीतील महिलांचा पक्षप्रवेशाने काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळाल्याचे मत यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

गेल्या १० वर्षापासून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षेत्र विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. तद्वतच संपुर्ण क्षेत्रांतील सर्व समाजाला समान न्याय, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, अनेक सामजिक कार्य यासह अत्यावश्यक मूलभूत गरजा पुर्ण करुन नागरिकांच्या अडचणी दूर केल्या.अशा विविध कार्यांना प्रेरित होऊन ब्रम्हपुरी शहरातील सुप्रिया बनसोड, करिष्मा बारसगडे, पंचशीला बारसागडे ,संगीता गराडे ,पिंकी गराडे, कोमल मेश्राम, दीपक भशाखेत्रे, दिपाली बोरकर, श्रेया बागडे, सुनिता बागडे, स्नेहलता कोरवते,निकिता नंदनवार, राधिका नागपुरे ,प्रियंका कांबळे, दर्शना रामटेके, निर्मला रामटेके, वनमाला शेंडे, राईबाई भशाखेत्रे, देवळाबाई भानारकर ,सिंधू गराडे, यांचा सह अनेक महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी पक्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व महिलांचे दुपट्टा टाकून स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here