prabodhini news logo
Home कविता आजची कविता – रम्य ते बालपण

आजची कविता – रम्य ते बालपण

0
178

बालपण छोटे
मन असे मोठे
नेहमीच खेळतो
दगड आणि गोटे।।

एक दगड पकडून
त्याला आणाचे घरी
मध्येच साथ त्याची
कधी सोडायची बरी।।

कधी विटी दांडू
कधी लंपन डाव
लहानपणी खेळ
खेळायचो आम्ही राव।।

गल्ली गल्लीत आमचे
असे खेळ चालायचे
खेळण्यात आमची
तहानभूक विसरायचे।।

रम्य ते बालपण असे
आज कुठेच दिसत नसे
एकत्रित कुटुंबात सुद्धा
आज मोबाईल हाती असे।।

कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here