prabodhini news logo
Home महाराष्ट्र सम्यक दर्शन राज्यस्तरिय साहित्य समूह सोलापूर तर्फ महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा क्र....

सम्यक दर्शन राज्यस्तरिय साहित्य समूह सोलापूर तर्फ महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा क्र. ८ चा निकाल घोषित

0
94

“महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी” ठरले मा. कवी – गवाजी बळीद, चापडगाव जि. अहमदनगर तर “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” ठरल्या मा. कवयित्री- वैशाली राजीव खंडारे, छत्रपती संभाजी नगर. (औरंगाबाद) विजयी

सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय समूहात प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाते. महापुरुषांच्या विचारांचे स्मरण व्हावे यासाठी वैचारिक विषयांवर ही स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कवी आणि कवयित्री मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
यावेळी स्पर्धा क्र. ८ चा विषय होता..”मी बुद्धांकडे का वळलो?” डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या विषयावर अनेक कविता आणि लेख आल्या. नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण रचनांचा सन्मान केला गेला. सर्व रचना व लेख वाखाणण्याजोगे होते.

“सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्र. ८ दि. १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान घेण्यात आली होती.

या काव्यलेखन स्पर्धेत यावेळी
“महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” हा सन्मान प्रा. गवाजी बळीद चापडगाव जि.अहमदनगर यांना मिळाला आहे. त्यांचा “रंग उगवतीचे” हा काव्यसंग्रह २००२ साली प्रकाशित झाला आहे तसेच विद्यार्थी व शिक्षक कवी संमेलनाचे आयोजन त्यांनी केले आहे. अनेक पुरस्काराचे ते मानकरी असून कविता लेखनाचे सुमारे १५०० सन्मानपत्र त्यांना प्राप्त आहेत. त्यांनी दिनविशेष, भाषिक कोडे, कथा लेखन, प्रसंग लेखन केले आहे. त्याचप्रमाणे महा मानवांच्या कार्यावर १५० अभंग लेखन केले आहे.

या स्पर्धेत “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” चा सन्मान कवयित्री मा.वैशाली राजीव खंडारे छ. संभाजीनगर यांना मिळाला आहे. कवयित्री विश्वसत्य फाऊंडेशन च्या अध्यक्ष आहेत. तसेच त्या लोटस इंग्लिश स्कूल, दि. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, छ. संभाजीनगर च्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांना आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मागास घटकांना समाजाच्या शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी गेल्या १२ वर्षापासून त्या कार्यरत आहेत.

दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

सामाजिक प्रबोधनाच्या हेतूने या आँनलाईन साहित्य समूहाची निर्मिती करण्यात आली आहे. या समूहाचे संस्थापक मा. देविदास गायकवाड तसेच सौ.सुनिता तागवान व सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत.

प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाईल. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जाणार आहे. तेव्हा पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सातत्याने सहभागी होत रहावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here