पुन्हा त्या वळणावर
आठवण तुझी आली
भेटलो त्या जागेवर
पुन्हा चांद रात झाली।।
दाट धुके पसरलेले
वळणा वळणावर होती
पाखरांची तीच किलबिल
पुन्हा पुन्हा चालू होती।।
नदीचे ते गाणे अनोखे
सुरात सूर मिसळत होते
त्याच त्या आठवणीत मला
पुन्हा पुन्हा नेत राहते।।
गारवा तो पूर्वीचा पहा
वाऱ्यासवे मिसळून गेला
भूतकाळ तुझा माझा
पुन्हा पुन्हा सांगून गेला।।
नवलपरी घडून सारेच गेले
पाऊल खुणा त्याज्या दिसल्या
रानी वनी झाडे वेली त्या जागेवर
पुन्हा पुन्हा गालात हसल्या।।
आठवणीत रममाण झाले
पुन्हा शुभ्र चांदणे दिसले
त्याच वेड्या आठवणीसोबत
मीही पुन्हा गालात हसले।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

