किलबिल शब्द सृष्टीचे रूप,
प्रत्येक सुरात आनंद थोर,
सुमधुर प्रचिती आनंदाची,
ऐकू येते होताच भोर.
किलबिल शब्दांचा गुंजारव,
आकाशाला ओढ प्रीतीची,
क्षणोक्षणाला नवी आस,
सूर्यकिरणांच्या हो भेटीची,
उषेच्या किरणात उडता,
प्रत्येक फेरी नवा आनंद,
गातात नवे गाणे गोड,
मोकळ्या नभी उडे स्वछंद
रंगीत पंखी थेंबांचा खेळ,
पाऊस आला तर हसती,
थेंबा सोबत झोके घेती,
भिजवून घेती डोळे मिटती.
तृणांच्या गुंफलेल्या त्या बंध,
घरट्यात आपुल्या विसावे,
कुटुंबात उबदार आनंद,
सांज झाले की परतावे.
कवयित्री सौ. पल्लवी संजय अल्हाट
श्रीरामपूर

