
ऐक शब्द होता प्रेमाचा
सांगून तुला कळणार नाही
आपुलकी, जिव्हाळा ,प्रेम
कदाचित तुझ्या शब्दकोशात नाही…1
नात जपायच असत अस
साय जशी दुधावरची
मी चालली वाट प्रेमाची
कामना केली मृगजळाची…2
पाहून पाहून वाट तुझी
चंद्र मावळायचा थांबला
तू आठवशील बघ
गेलेल्या प्रत्येक क्षणाला…3
असेल नसेल प्रेम जीवनात
आठवणीत सार असत
त्यापासून कितीही दूर जा
गेलेला प्रतेक क्षण पाठलाग करत…4
प्रेम माझे जसे
अथांग सागर पसरलेला
असतो तू माझ्या
रोमारोमात सामावलेला…5
काय गावी प्रेमाची गाथा
शब्द शब्द रचूनी मांडली व्यथा
व्यक्त भावना केल्या प्रेमाच्या
रचल्या मी प्रेम कविता…..6
कवयित्री सौ.वैजयंती विकास गहूकर
योगा टीचर जिल्हा. चंद्रपूर














